राष्ट्रवादी नगरसेवकाचा भरचौकात हवेत गोळीबार !

राष्ट्रवादी नगरसेवकाचा भरचौकात हवेत गोळीबार !

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सूरज सातव यांनी दस-याच्या दिवशी भरचौकात सीमोल्लंघनाच्या नावाखाली रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.

नगरसेवक सूरज सातव यांच्याकडचा परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून या गोळ्या हवेत झाडण्यात आल्यात.या घटनेला आठवडा उलटल्यानंतर आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. उपस्थितांमध्ये रूबाब दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेला आहे.  पोलीस मात्र आठवड्यानंतरही या घटनेबाबत कुठलीच माहिती नसल्याचे सांगत आहेत.

COMMENTS