शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आम्ही कमी पडलो; गिरीष बापट यांची कबुली

शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आम्ही कमी पडलो; गिरीष बापट यांची कबुली

औरंगाबाद – राज्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आम्ही कमी पडलो अशी स्पष्ट कबुली राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी दिली. भविष्यात गोदामाअभावी शेतकऱ्यांचा माल खरेदी करता आला नाही, असे होऊ नये म्हणून राज्य सरकार 300 हून अधिक गोदामे बांधणार असल्याचेही बापट यांनी औरंगाबाद येथे बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी बोगसपणे तूर विक्री करत असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही बापट म्हणाले. 22 मेपर्यंत तूर खरेदीचे टोकन संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. त्या सर्वांची तूर खरेदी केली जाईल, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

COMMENTS