सदाभाऊ खोत काढणार नवी शेतकरी संघटना ?

सदाभाऊ खोत काढणार नवी शेतकरी संघटना ?

सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातले मतभेद विकोपाला गेले आहेत. त्यातूनच सदाभाऊ खोत लवकरच राजू शेट्टींच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून बाहेर  पडतील किंवा त्यांची सघटनेतून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. येत्या 21 तारखेनंतर या घडामोडी घडणार आहेत. सदाभाऊ स्वाभीमानीतून बाहेर पडल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जातंय. मात्र महापॉलिटिक्सला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदाभाऊ खोत हे भाजपमध्ये न जाता नवी शेतकरी संघटना काढण्याच्या तयारीत आहेत. भाजपमध्ये आपल्याला किती महत्व दिलं जाईल याबद्दल त्यांच्या मनात साशंकता आहे, त्यामुळे सदाभाऊंनी नव्या संघटनेसाठी चाचपणीही सुरू केली आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेशी साधर्म असलेलं नाव घेऊन सदाभाऊ संघटना काढण्याची शक्यता आहे. त्याबाबत त्यांनी काही कार्यकर्त्यांशी बोलणी सुरू केल्याचीही माहिती मिळतीय. सध्याच्या राजू शेट्टी यांच्या संघटनेतील फारसे कार्यकर्ते किंवा जिल्हाध्यक्ष त्यांच्यासोबत नसल्यामुळे स्वाभिमानी बाहेरील नेत्यांची जुळवा जळव करण्याचा सदाभाऊंचा प्रय़त्न आहे. सध्या सदाभाऊंसोबत केवळ दोन जिल्हाध्यक्ष आणि काही कार्यकर्ते असल्याचं बोलंलं जातंय. शेतकरी संप मोडल्याचा आरोप झालेले काही नेते सदाभाऊंच्या नव्या संघटनेते असतील अशी शक्यता आहे. त्या नेत्यांसोबत त्यांची चर्चाही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नव्या संघटनेची चाचपणी करण्यासाठी सदाभाऊ येत्या 22 तारखेनंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS