सिंचन घोटाळ्यात माझा कोणताही सहभाग नाही-  अजित पवार

सिंचन घोटाळ्यात माझा कोणताही सहभाग नाही- अजित पवार

नागपूर –  विदर्भातील सिंचन घोटाळ्यात माझा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या प्रलंबित असणाऱ्या याचिकांमधून प्रतिवादी म्हणून वगळण्यात यावे, असा अर्ज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठसमोर सादर केला आहे. त्या अर्जावर आता दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती जिल्ह्यातील भाटकुली येथील निम्न पेढी प्रकल्प, चांदूरबाजार येथील रायगड नदीवरील प्रकल्प, दर्यापूर येथील वाघाडी आणि बुलडाणा येथील जीगाव सिंचन प्रकल्पाचे कंत्राट माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या कंपनीला दिले. बाजोरिया यांना राजकीय लाभातून हे कंत्राट मिळाले असून त्यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिका नागपूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिवादी करण्यात आले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावताना अजित पवार यांनाही नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता.

COMMENTS