सुनिल तटकरे @ 30,  जीवघेणा हल्ला ते अंतुले, वसंतदादा,  विलासराव, पवार आणि अजित पवारांच्या आठवणींना दिला उजाळा, सर्वपक्षीय नेत्याकडूनही तटकरेंवर स्तुतीसुमने !  

सुनिल तटकरे @ 30,  जीवघेणा हल्ला ते अंतुले, वसंतदादा,  विलासराव, पवार आणि अजित पवारांच्या आठवणींना दिला उजाळा, सर्वपक्षीय नेत्याकडूनही तटकरेंवर स्तुतीसुमने !  

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राजकीय आणि सामाजिक कार्याची 30 वर्ष पूर्ण केली. त्यावर त्यांच्या समग्र तटकरे या पुस्तकाचं प्रकाशन काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी पवारांस सर्वपक्षीय नेत्यांनी तटकरेंच्या कारिकर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर तटकरेंनीही आपल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा धावता आढावा घेतला.

रायगडचा राजकारणाचा बाज वेगळाच राहिला आहे. जनतेने प्रेम केले असले तरी अनेकवेळा स्थानिक नेत्यांकडून कटू राजकीय अनुभव आल्याचं तटकरे यांनी सांगितलं. त्यामुळे स्थानिक राजकारणात अनेकवेळा घरावर मोर्चे आले. पण आम्ही संघर्ष करत राहिलो. वडिलांना जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनानंतर 10 व्याच दिवशी ए आर अंतुलेंनी काँगेसाच पदाधिकारी केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख तटकरेंनी केला. त्याच काळात अंतुले समर्थक म्हणून माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची कटू आठवणही त्यांनी सांगितली.

त्यानंतर वसंतदादांनी 1985 साली विधानसभेची उमेदवारी दिली. पण १९९० साली मला उमेदवारी मिळणार नाही असे मला विजयदादांनी सांगितले. त्यावेळी अपक्ष म्हणून अर्ज भरला पण साहेबांनी मला अर्ज मागे घ्यायला लावला. तर 1992 साली अंतुलेंनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केल्याचंही तटकरेंनी सांगितलं. रायगड जिल्हा परिषदेत मिळालेल्या शिक्षणामुळे मी पुढे 15 वर्षात मंत्री म्हणून काम करू शकलो असंही ते म्हणाले. जिल्हा परिषदेत  ३ वेळा माझ्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला. तेव्हा ५० टक्क्यात तो मंजूर व्हायचा, पण पवारांनी रायगडसाठी कायदा बदलून तो २/३ केला. त्यामुळे मी 1999 साली राष्ट्रवादीत आलो अशी आठवणही तटकरेंनी सांगितली.

विलासराव देशमुखांचीही तटकरे यांनी आठवण सांगितली. तू राष्ट्रवादीत जाण्याचा योग्य निर्णय घेतलास, तुला काँग्रेसमध्ये न्याय मिळाला नसता.  पहिल्यांदा मंत्री मंडळात सहभागी होण्याचा फोन आला  अजितदादांची मैत्री आणि पवारसाहेबांची साथ मोलाची ठरली असंही तटकरे म्हणाले. कोकणातून तीन मुख्यमंत्री झाले. पण अर्थसंकल्प मांडण्याची संधी आपल्याला एकट्यालाच मिळाली असंही तटकरे म्हणाले. मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा सगळ्यात जास्त काळजी पवार साहेबांना वाटली होती.  ते मला म्हणाले तू विधानपरिषदेत ये. पण मी अंतुलेंच्या मतदारसंघात लढलो,  लढाई सोपी नव्हती,  पण मी ती जिंकलो असंही तटकरे म्हणाले.

अनेक आरोप झाले, पण त्यांना सक्षमपणे तोंड दिले.  चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, जयकुमार रावल,  जानकर,  सदाभाऊ खोत हे सगळे आज आले. आपल्या राज्यातील राजकारण वेगळे आहे हे पवारसाहेबांनी सांगितले.  आज अन्य काही नेते आले नसतील पण मला त्याबद्दल काही बोलायचे नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीबद्दल नाराजी व्यक्त केली.

 

सुनिल तटकरेंवर कोण काय म्हणाले ?

शरद पवार

– एका सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करत इथपर्यंत आलेल्या व्यक्तीचे काम या पुस्तकाने समोर आले आहे

– संघटना कौशल्य, प्रशासनावर पकड याबरोबरच आपल्या समाजाचा पाठिंबा आपल्याला लागतो, पण तटकरे याला अपवाद आहेत

– ते ज्या समाजातून आलेत तिथे त्यांच्या समाजाची १००-200 मते असतील

– पण त्यांनी सर्व समाजाचा पाठिंबा मिळवला

– सुनील तटकरेंना सुरुवातीला खूप विरोध झाला, पण त्या विरोधकांना आता त्यांनी बरोबर घेतले आहे

……………………………………………………

चंद्रकांत पाटील,  महसूल मंत्री

– चांगलं व्यक्तिमत्त्व या पुस्तक रुपाने समोर आलं आहे

– राजकारणात एवढा वेळ देऊन क्रिकेट, नाट्य या आवडी जपतात

– मधल्या काळात आलेल्या संकटात खचून न जाता ते संकटाचा सामना करत धीरोदात्तपणे उभे आहेत

…………………………………..

जयंत पाटील, शेकाप

– आमच्यात मतभेद झाले पण आम्ही कौटुंबिक संबंध चांगले ठेवले

– मी पवारसाहेबांना सांगतो यांना लोकसभेची तिकीट द्या, आम्ही निवडून देतो

– म्हणजे ही ब्याद दिल्लीला गेली की आम्ही इथे मोकळे

– तटकरेंचा सन्मान हा आमच्या रायगड जिल्ह्याचा सन्मान आहे.

 

COMMENTS