“एक महिला म्हणून ‘मी’ भाजपमध्ये सुरक्षित नाही, पक्षात महिलांचाही प्रयोग म्हणून वापर होऊ शकतो !”

“एक महिला म्हणून ‘मी’ भाजपमध्ये सुरक्षित नाही, पक्षात महिलांचाही प्रयोग म्हणून वापर होऊ शकतो !”

मुंबई – भाजपवर एका महिला पदाधिका-यानं जोरदार घणाघात करत मल्लिका राजपूत या अभिनेत्रीने भाजपला रामराम ठोकला आहे. स्त्री सुरक्षेचं कारण देत, आपण भाजपमध्ये सुरक्षित नसल्याचं मल्लिकानं म्हटलं आहे. मल्लिका राजपूत उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरची रहिवासी आहे. भाजपचे राज्यसभा खासदार ओम माथूर यांच्यासह ती भाजप यूथ विंग महाराष्ट्रसाठी काम करत होती. उन्नाव आणि कठुआ गँगरेपसारख्या घटना घडल्यानंतर एक महिला म्हणून मी भाजपत सुरक्षित नसल्याचं  मल्लिका राजपूतने म्हटलं आहे. भाजपमधीलच पदाधिका-यानं असं वक्तव्य केलं असल्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे.

दरम्यान मल्लिका राजपूतने अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत रिव्हॉल्वर राणी सिनेमात काम केलं आहे. त्यानंतर तिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु राजकीय पोळी भाजण्यासाठी जो पक्ष हिंदू-मुस्लिम दंगली भडकवू शकतो, तो पक्ष महिलांचाही प्रयोग म्हणून वापर करु शकतो असा घणाघात करत भाजपला घरचा आहेर दिला आहे.
 

COMMENTS