भाजपसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य !

भाजपसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य !

मुंबई – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. परंत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजप अच्छुक असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर येणार आहे. त्यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर युती होणार की नाही याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. अशातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे. आम्ही ‘साफसफाईला’ सुरुवात केली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अमित शाहांच्या भेटीनंतर शिवसेना युतीसाठी तयार होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान अमित शाह उद्या भाजपाच्या संपर्क दौऱ्यासाठी मुंबईत येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातच्या आसपास उद्धव ठाकरे आणि अमित शहा एकमेकांना भेटणार आहेत. या भेटीच्या माध्यमातून भाजपाने एकप्रकारे युतीच्या टाळीसाठी हात पुढे केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे अमित शहा यांना टाळी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. परंतु आदित्य ठाकरे यांनीही केलेल्या या सूचक विधानामुळे सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत.

COMMENTS