विधानभवन आणि आज संसदेचं कामकाज बघितलं, कुठे काम करायला आवडेल ?, या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर !

विधानभवन आणि आज संसदेचं कामकाज बघितलं, कुठे काम करायला आवडेल ?, या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर !

नवी दिल्ली – शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज संसदेचं कामकाज पाहिलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही पावसाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये विधानभवनात जाऊन विधानसभेचं कामकाज पाहिलं. त्यानंतर आज दिल्लीत येऊन संसदेचं कामकाज पाहिलं. त्यामुळे तुम्हाला जास्त कुठे काम करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार आणि खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी काम करायला आवडेल असं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध विभागांमधील समस्या केंद्रीय मंत्र्यांपुढे माडल्या. तसेच त्यावर काय उपाययोजना करता येईल याबाबतही चर्चा केली. शाळांमध्ये अव्वाच्या सव्वा डोनेशन घेऊन पालकांची लूट केली जात आहे. याबात आदित्य ठाकरे यांनी प्रकाश जावडेकरांसमोर काही समस्या मांडल्या. तसेच राज्यातील रस्ते व वाहतुकीसंदर्भात त्यांनी नितीन गडकरींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

COMMENTS