शिवसेना मंत्र्यांची यादी, आदित्य ठाकरेंसह ‘हे’ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ?

शिवसेना मंत्र्यांची यादी, आदित्य ठाकरेंसह ‘हे’ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ?

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्यांदाच आमदारपदी विराजमान झालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे पिता मुख्यमंत्री आणि पुत्र मंत्री असं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे शैक्षणिक मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे संभाव्य मंत्री

आदित्य ठाकरे – वरळी, मुंबई

उदय सामंत – रत्नागिरी,रत्नागिरी, कोकण

संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ, विदर्भ

अॅड अनिल परब – मुंबई, विधानपरिषद

गुलाबराव पाटील – जळगाव, ग्रामीण (जळगाव) – उत्तर महाराष्ट्र

दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक) – उत्तर महाराष्ट्र

शंभूराजे देसाई – पाटण (सातारा) – पश्चिम महाराष्ट्र

अब्दुल सत्तार – सिल्लोड (औरंगाबाद) – मराठवाडा

डॉ. संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद) – मराठवाडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री

अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, दत्ता भरणे, किरण लहामटे

काँग्रेसचे संभाव्य मंत्री

के. सी. पाडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, पश्चिम महाराष्ट्र,विश्वजित कदम,प्रणिती शिंदे, विजय वड्डेटीवार
यशोमती ठाकूर, अमिन पटेल

COMMENTS