देशाच्या, राज्याच्या राजकारणात पहिलीच घटना, मुख्यमंत्र्यांना उद्देशून पाठवलेल्या ‘त्या’ जाहीरातीमुळे चर्चेला उधाण !

देशाच्या, राज्याच्या राजकारणात पहिलीच घटना, मुख्यमंत्र्यांना उद्देशून पाठवलेल्या ‘त्या’ जाहीरातीमुळे चर्चेला उधाण !

मुंबई –  देशाच्या, राज्याच्या राजकारणात पहिलीच अशी घटना घडली आहे. या घटनेची देशभरात आणि राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. औरंगाबाद येथील कन्नड विधासभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर करण्यासाठी चक्क वृत्तपत्रात जाहीरात दिली आहे. आमदारकीचा राजीनामा मंजूर करावा यासाठी जाथव यांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ही जाहीरात दिली आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाची अवस्था पाहून मी उद्विग्न होऊन माझा विधानसभेचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे परंतु  अद्यापही त्यांनी तो मंजूर केला नसल्याचं जाधव यांनी या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून 2014ची निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढवली. त्यात त्यांनी विजयही मिळवला. मात्र, पुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी शिवराज्य बहुजन पक्ष नावाने स्वतंत्र राजकीय पक्ष काढल्याची घोषणाही केली. दरम्यान, लोकमतमध्ये त्यांनी शिवराज्य बहुजन पक्ष या बॅनरखाली ही जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या या जाहीरातीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

COMMENTS