शेतक-यांचं आंदोलन म्हणजे पब्लिसिटी स्टंट – केंद्रीय कृषीमंत्री

शेतक-यांचं आंदोलन म्हणजे पब्लिसिटी स्टंट – केंद्रीय कृषीमंत्री

नवी दिल्ली देशभरात सुरु असलेलं शेतकरी आंदोलन म्हणजे फक्त पब्लिसीटी स्टंट असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलं आहे. मीडियात चमकण्यासाठी शेतकरी आंदोलन सुरु असून मीडियात चमकण्यासाठी काहीतरी वेगळं काम करावं लागतं. काही वेगळं केलं तरच मीडिया प्रसिद्धी देते असं वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केलं आहे. गेली अनेक दिवसांपासून दुष्काळामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्याचबरोबर शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून सरकारला जागं करण्यासाठी देशभरातील शेतक-यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. परंतु या आंदोलनावर तोडगा काढण्यापेक्षा त्यांचं आंदोलन हे स्टंट असल्याचं स्वतः कृषीमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कृषीमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळत असल्याचं दिसून येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राधामोहन सिंह यांच्यावर हल्ला चढवला असून अशा मंत्र्यांना लाथ मारुन मंत्रिमंडळातून हाकला अशीच मागणीच राजू शेट्टी यांनी केली आहे. राधामोहन सिंह यांच्या या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS