अखेर अहमदनगरच्या जागेचा तिढा सुटला, आज घोषणा होण्याची शक्यता !

अखेर अहमदनगरच्या जागेचा तिढा सुटला, आज घोषणा होण्याची शक्यता !

मुंबई – गेली अऩेक दिवसांपासून चर्चेत असलेला अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. अत्यंत विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेनं काँग्रेससाठी सोडली आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे गेली 3 वर्ष या मतदारसंघातून लोकसभेची तयारी करत होते. मात्र ही जा राष्ट्रवादीकडे होती. त्यामुळे राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार नव्हती. डॉ. सुजय विखे हे मी लोकसभा लढवणारच, माझे चिन्ह काय असेल हे माहित नाही अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने करत होते. सुजय विखे यांची वक्तव्य म्हणज्ये दोन्ही काँग्रेसच्या हायकमांडलाच चॅलेंज आहे असा मेसेज विखेंच्या विरोधकांनी हायकमांडपर्यंत पोचवला होता. त्यामुळे दोन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते डॉ. सुजय विखे यांना जागा सोडायला सहजा सहजी तयार नव्हते.

अखेर काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. विखे पवार हा पूर्वीचा वाद आता संपवण्याची इच्छा आहे. ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हीचा आता आम्हाला सांभाळून घ्यावे. तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आता तुम्हीच नातवासाठी जागा सोडा अशी विनंती पवार यांना केली होती. सुजय विखे यांनीही पवार यांची भेट घेत जागा सोडण्याची विंनंती केली होती. त्यानंतर खरगे यांनीही पवार यांना जागा सोडण्याबाबत विनंती केली. त्यानंतर ही जागा सुजय विखे यांच्यासाठी सोडण्यात आली. आता शिर्डीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाण्याची शक्यता आहे. तंसच शिर्डीच्या जागेची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवण्यात आल्याचंही बोललं जातंय.

COMMENTS