जयंत पाटलांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची, सत्कार करण्यावरुन एकमेकांवर भिडले !

जयंत पाटलांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची, सत्कार करण्यावरुन एकमेकांवर भिडले !

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असल्याचं पाहण्यास मिळालं. अहमदनगरमध्ये आज जयंत पाटील गेले होते. त्यावेळी जयंत पाटील राष्ट्रवादी भवनामध्ये गेल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी काही कार्यकर्ते समोर आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिहा उपाध्यक्ष किरण काळे देखील उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते जंयत पाटील यांचा सत्कार करण्यासाठी समोर आहे. त्यामुळे किरण काळे आणि या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.यावेळी किरण काळे यांनी माझा खून करायचा का? असा सवालच केला आहे.  त्यामुळे याठिकाणचं वातावरण चांगलं तापलं असल्याचं पहावयास मिळालं परंतु काही वेळानंतर संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांना इतर पदाधिकाऱ्यांनी शांत केलं.

COMMENTS