अहमदनगर महापालिकेतील पोटनिवडणुकीत काँग्रेसनं गड राखला !

अहमदनगर महापालिकेतील पोटनिवडणुकीत काँग्रेसनं गड राखला !

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं गड राखला आहे. काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर यांचा सुमारे साडेचारशे मतांनी विजयी झाला आहे. या पोटनिवडणुकीत शिवेसना व काँग्रेसमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली आहे. या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने गड राखला आहे तर भाजपाला डिपॉझिटही वाचवता आलं नाही. काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.

दरम्यान विशाल कोतकर यांची ५०० मतांची आघाडी झाल्यानंतर काँग्रेसच्या गटात उत्साहाचे उधाण आले होते. ही आघाडी कायम राखत विशाल कोतकर यांनी ४५६ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या विजय पठारे यांनी घेतले १८८६ मते तर भाजपचे महेश सोले यांना अवघी १५६ मते मिळाली असून भाजपाची अनामत रक्कमही जमा करण्यात आली आहे.

COMMENTS