भीक नको पण कुत्रं आवर, प्लॅस्टिक बंदीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया !

भीक नको पण कुत्रं आवर, प्लॅस्टिक बंदीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया !

ठाणे – राज्यात प्लॅस्टिक बंदीवर बहुतक जणांनी चांगल्या प्रतिक्रिया दिला आहेत. अनेक नागरिकांनी याचं स्वागत केलं आहे. मात्र याबाबत दंड आणि शिक्षा याबाबत मात्र काही ठिकाणाहून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्लॅस्टिकची पिशवी सापडल्यास पाच हजार रुपये दंडाची तरतूक करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकराचा दंड काल वसुल करण्यात आला. त्यावरून नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे.

दंडाची रक्कम आणि शिक्षेची तरतूद कमी करावी, लोकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी नागरिकांमधून येत आहे. काल काँग्रेसचे आमदरा नितेश राणे यांनीही अशा प्रकारची दडांच्या शिक्षेला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दंडाची रक्कम आणि शिक्षेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्लॅस्टिकबंदीला विरोध नाही, मात्र त्याची हुकुमशाही पद्धतीने अंमलबाजवणी नको अशी मागणी त्यांनी केली आहे. मनसेनंही 5 हजार रुपयांच्या दंडाला विरोध केला आहे.

COMMENTS