नाहीतर आज तुमच्यासमोर दिसलोच नसतो, अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव !

नाहीतर आज तुमच्यासमोर दिसलोच नसतो, अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव !

पुणे –  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक सल्ला दिला आहे. वाहने चालवताना तपासून चालवली पाहिजेत’, त्या वाहनांची काळजी घेतली पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते इंदापुरातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आपण अपघातातून कसं वाचलो याचा किस्सा कार्यकर्त्यांना सांगितला आहे. मी अॅम्बेसेडर गाडीने चाललो होतो, समोरून एक ट्रक येत होता. तेव्हा गाडीचे उजवीकडे टायर फुटले आणि जागीच गाडी फिरली. जशी फिरली तशी भिंतीला जावून धडकली. सुदैवाने डावीकडचे चाक फुटले नाही. नाहीतर आज मी तुमच्यासमोर दिसलोच नसतो, असा थरारक अनुभव अजित पवारांनी सांगितला.

तसेच रस्त्यावर चालताना शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य एका क्षणात संपू शकते, त्यामुळे अतिघाई व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. नियम पाळण्याची सुरवात प्रत्येकाने स्वताःपासून केली तर अपघात होण्याची शक्यता मावळते. अपघातातील जखमींना मदत करुन त्यांचा जीव वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,

त्यामुळे कसलीही भीती न बाळगता अपघातग्रस्ताचा जीव वाचविण्यास प्रत्येकाने प्राधान्य द्यावे असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.हेल्मेटचा वापर करताना कमीपणा कसला वाटतो, असा प्रश्न विचारत दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा असा सल्लाही पवार यांनी दिला.

COMMENTS