पार्थ पवार विधानसभेच्या मैदानात?, अजित पवार म्हणतात…

पार्थ पवार विधानसभेच्या मैदानात?, अजित पवार म्हणतात…

सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सोलापूर येथील इच्छुक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली आहे. सरकारमधील काही मंत्र्यांचे पंख छाटले गेलेत. पीक विम्याबाबत मोर्चे कसले काढताय? कर्जमाफी केली तर आम्ही कौतुक करु. कर्जमाफी हे नवे गाजर दाखवलेय. निवडणुका जिंकण्यासाठी या घोषणा सुरु असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान आगामी विधानसभेसाठी आम्हाला काहीही करुन १७५ जागा निवडून आणायच्याच आहेत. याचा प्रयत्न सुरु असून ३० वर्षाचा अनुभव पणाला लावून आम्ही विधानसभा लढवणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभेत पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उभारणार नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अनेक लोक पक्षांतर करत आहेत. आमच्याही पक्षाचे काही लोक गेले. कोणीही गेले तरी पक्ष चालत राहतो, काही प्रमाणात फटका बसतो मात्र ती जागा भरुन काढली जाते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS