उपसरपंचाला अजित पवार म्हणाले…आज असा नटलाय की लग्नात देखील इतका नटला नव्हतास !

उपसरपंचाला अजित पवार म्हणाले…आज असा नटलाय की लग्नात देखील इतका नटला नव्हतास !

नाशिक – नाशिकमध्ये आज भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांचं भूमिपजून केलं. या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात, अजित पवारांनी टोलेबाजी करत धमाल उडवून दिली. सकाळी 8 च्या आधी अजित पवारांनी दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन केलं. त्यानंतर त्यांनी वरखेडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाला हजेरी लावली. यावेळी अजित पवार म्हणाले, एखाद्या ग्रामपंचायत कार्यालयाला लिफ्ट असते हे मी इथेच पाहिलं”. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंचांसह गावकरी उपस्थित होते. अजित पवारांनी उपसरपंचांच्या पेहरावावरुनही टोलेबाजी केली. राजेंद्र (उपसरपंच) आज असा नटलाय की लग्नात सुद्धा इकता नटला नसेल, असं अजित पवार म्हणताच, उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

दरम्यान आघाडीचं सरकार आहे, मात्र  ग्रामविकास, जलसंपदा, वित्त नियोजन, अन्न नागरी पुरवठा खातं पवारसाहेबांनी राष्ट्रवादीकडे घेतले. अरे काय पाहिजे सांग, मी द्यायला बसलोय सांग, असं अजित पवार म्हणाले.तसेच बळीराजाला कर्जमाफी देण्याचा प्रयत्न करतोय. 2 लाखांच्यावर पीक कर्ज घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 2 लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱयांना कर्जमाफ करण्याचा प्रयत्न करतोय. पण 2 लाखांवर ज्यांचे कर्ज आहे ,त्यांनी देखील थोडे भरावं. शेतकरी समाज ही आपली जात आहे. आपण मुद्दाम कोणाचं नुकसान करत नाही. आम्ही पण पीक कर्ज काढतो, पण ते वेळेत फेडतो.असंही अजित पवार म्हणाले.

COMMENTS