त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही – अजित पवार

त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही – अजित पवार

मुंबई – भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्रशासकांनी जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती . मात्र अजित पवार यांनी या निवडणुकीसाठी नकार दिला आहे. राज्याची निवडणूक जवळ आल्याने निवडणूक लढवणार नसल्याचं अजित पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे भारतीय महासंघाच्या अध्यक्षपदासाठी मला वेळ देता येणार नाही. मी जे काम हाती घेतो, ते पूर्ण जबाबदारीने पार पाडतो. त्यामुळे त्या पदासाठी मी वेळ देऊ शकत नसेल तर तिथे जाणे अयोग्य आहे असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.त्यामुळे आता या पदासाठी राज्य कबड्डी संघटनेने आस्वाद पाटील यांचे नावे निश्चित करण्यात आले आहे.

COMMENTS