शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य!

शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य!

नागपूर – राज्यातील शेतकय्रांच्या कर्जमाफीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु आहे. कर्जमाफी देताना आधार लिंक करुन कर्जमाफी देता येईल का याची चाचपणी सुरु असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान ते बोलत होते.

दरम्यान सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेतही अजित पवार यांनी दिले आहेत.

COMMENTS