सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली, पण आता चुकीला माफी नाही – अजित पवार

सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली, पण आता चुकीला माफी नाही – अजित पवार

मुंबई – मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. याचे पडसाद आज राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत उमटले. शिंदे यांच्या भाजप प्रवेशावरुन माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना चिमटा काढला. शिवसेनेला फसवलंय, पण शिवसेना एवढी संमोहित झालीय की, त्यांना दिसत नाही. आम्ही चुकलोय, पण त्याचा एवढा फायदा घेऊ नका. तुमच्याकडेही ज्योतिरादित्य शिंदे होईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिलं. सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली. पण आता चुकीला माफी नाही.” हे वक्तव्य करताना अजित पवार यांनी बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कटाक्ष टाकला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही मानेने नकार देत चुकीला माफी नसल्याचं सूचित केलं. तसेच आपलं सरकार होणार आहे, होणार आहे, असंच तुम्हाला पाच वर्ष म्हणावं लागेल. इकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याची काळजी घ्या असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

यावळी मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना थेट त्यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली. यावर आक्रमक होत मी शपथ घेतली मान्य करतो. मी काही लपून करत नाही, तिथे गेलो, ते सोडून इथे आलो आणि आता मी इथे मजबूत बसलो असल्याचं अजित पवार म्हणाले.

COMMENTS