राष्ट्रवादी सोडण्याबाबत अजित पवार म्हणाले…

राष्ट्रवादी सोडण्याबाबत अजित पवार म्हणाले…

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अजित पवार हे राष्ट्रवादी सोडणार असल्याचंही बोललं जात होतं. परंतु याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्यानं अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला. ज्या पक्षानं मला मान-सन्मान  व पदं दिली त्या पक्षाविरोधात काही करण्याचा विचारही करू शकत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच आपल्यामुळे पवार साहेबांची बदनामी होतेय. माध्यमांच्या बातम्यांमधून ते देशभर गेलं. फक्त माझ्याशी नातं असल्याने शरद पवारांचं नाव ईडीच्या प्रेसनोटमध्ये आलं. या वयामध्ये शरद पवारांना आपल्यामुळे त्रास होतोय असं वाटलं. या कारणाने अस्वस्थ झालो. म्हणून  कुणालाही न सांगता राजीनामा दिला असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

तसेच शरद पवारांचा या कुठल्याही कारखान्याशी, बँकेशी संबंध नाही. सतत आमच्याबाबत बातम्या कशा येतात. त्यांचा दूरावन्वयानेही संबंध नाही. 1088 कोटीची अनियमितता झाल्याचं सहकार मंत्री यांनी सभागृहात सांगितले, बाहेर आला तर 25000 कोटीचा आकडा कसा आला?, 11 हजार ठेवी असलेल्या बँकेत 25 हजारचा घोटाळा कसा झाला? असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बिनविरोध आलेलं होतं. सर्वपक्षीय लोक तिथे आहेत. भाजप, शिवसेना, शेकाप आणि राजकीय पक्षाशी संबंध नाही असे लोकही त्या संचालक मंडळात होते. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS