पार्थ पवारांवरील वक्तव्याबाबत अजित पवारांनी मौन सोडलं, शरद पवारांना म्हणाले…?

पार्थ पवारांवरील वक्तव्याबाबत अजित पवारांनी मौन सोडलं, शरद पवारांना म्हणाले…?

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत
वडिल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची बैठक झाली. यावेळी अजित पवार यांनी मुलगा पार्थची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. परंतु
या बैठकीदरम्यान पार्थ पवार यांच्याबाबतीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान अजित पवार यांनी पार्थ अजून लहान आहे, हळूहळू तयार होईल. मात्र त्याला असे सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावणं योग्य नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यामुळे पवार कुटुंबात संघर्ष निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु अजित पवार यांनी या प्रकरणी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

पार्थ पवारांनी घेतली शरद पवापांची भेट

पार्थ पवार यांनी काल शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. जवळपास सव्वा दोन तास शरद पवार, सुप्रिया सुळे यांची पार्थ पवारांशी चर्चा झाली. त्यानंतर पार्थ पवार सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले. या चर्चेत नेमकं काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही.

COMMENTS