मी खरं बोललो तर शिवसेनेच्या नेत्यांना मिर्च्या का झोंबल्या ? – अजित पवार

मी खरं बोललो तर शिवसेनेच्या नेत्यांना मिर्च्या का झोंबल्या ? – अजित पवार

कोल्हापूर – मी खर बोललो तर शिवसेनेच्या नेत्यांना कोल्हापूरी मिर्च्या का झोंबल्या असा सवाल रास्ट्रवादीचे नेते अजित पवार यानी विचारला आहे. सामना आग्रलेखाच्या माध्यमातून केलेल्या टिकेवर उत्तर देताना अजितदादा पवार यानी  शहरी भागातील लोकांना कळण्यासाठी वडील काढला आणि ग्रामीण भागातील लोकांना कळण्यासाठी बाप काढला. यात काय चुकलं असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. तसेच सामना पेपर कोणी जास्त वाचत नाही. कारण तो पेपर शिवसेनेचं मुखपत्र आहे. पण एखाद्या वृत्तपत्रातील अग्रलेखात अशी भाषा वापरणे शोभत नसल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटल आहे.

दरम्यान अजित पवार हे शरद पवार यांच्यामुळे आहेत या सामनातील टिकेवर उत्तर देताना, अजितदादा पवार यानी शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच अस्तित्वात असल्याचे विधान केल आहे. शिवसेनेची अशा पध्दतीची टिका म्हणजे विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणावी लागेल. त्याचबरोबर कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत असं देखील अजित पवारांनी म्हटल आहे.  कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या युवा एल्गार परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत अजित पवार बोलत होते.

COMMENTS