सुशीलकुमार शिंदेंच्या ‘त्या’ प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, सोलापूरच्या लोकांनी आम्हाला घर दिलंय!

सुशीलकुमार शिंदेंच्या ‘त्या’ प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, सोलापूरच्या लोकांनी आम्हाला घर दिलंय!

सोलापूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची आज सकाळी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये अचानक भेट झाली. यावेळी आवर्जून शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. ‘तुम्ही इथं थांबलात का’ ?, असा प्रश्न शिंदे यांनी विचारल्यानंतर, ‘सोलापूरच्या लोकांनी आम्हाला घर दिलंय, तिथेच आम्ही राहतो’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर प्रचारानिमित्त सोलापुरात मुक्कामी होते. त्यांना भेटण्यासाठी सुशीकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सोलापुरातील हॉटेल मध्ये पोहोचले. तिथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांची गर्दी होती. प्रकाश आंबेडकरही इथेच असल्याचे समजल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांची चौकशी केली.

COMMENTS