एका रात्रीत शिवसेनेनं भूमिका कशी काय बदलली? – अमित शाह

एका रात्रीत शिवसेनेनं भूमिका कशी काय बदलली? – अमित शाह

मुंबई – शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला होता. परंतु राज्यसभेत शिवसेनं या विधेयकावर टीका केली तसंच या विधेयकाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली.
एका रात्रीत त्यांनी भूमिका कशी काय बदलली? महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेनं याचं उत्तर द्यावं अशी खरमरीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केली. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात हे शिवसेनेने दाखवून दिलं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती बिल हे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठीचं विधेयक आहे असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. परंतु या विधेयकाच्या मतदानावर शिवसेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेनं याचं उत्तर द्यावं अशी खरमरीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केली. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात हे शिवसेनेने दाखवून दिलं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

COMMENTS