भाजपला हायकोर्टाचा दणका !

भाजपला हायकोर्टाचा दणका !

नवी दिल्ली – भाजपला हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. कोलकाता हायकोर्टानं भाजपला हा दणका दिला असून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना पश्चिम बंगालमध्ये ‘रथयात्रा’ काढण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला आहे.

दरम्यान रथ यात्रेला परवानगी मिळावी यासाठी भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रथयात्रेची परवानगी घेण्यासाठी आतापर्यंत पोलीस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, गृहसचिव यांना निवेदने देण्यात आली मात्र, त्यांच्याकडून आतापर्यंत कोणताही प्रतिसाद आला नाही, असे सांगत भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

रथ यात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो, पश्चिम बंगालमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे असं पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं होतं. त्यामुळे उच्च न्यायालयानंही रथयात्रा घेण्यास परवानगी नाकारली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जानेवारी रोजी होणार आहे.

COMMENTS