खासदार नवनीत कौर राणांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईत !

खासदार नवनीत कौर राणांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईत !

अमरावती – अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. परंतु त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून त्यांच्या छातीत खूप दुखत असल्याने त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.आता पुढील उपचारासाठी त्या मुंबईला येणार आहेत. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा उपचार घेणार आहेत.

दरम्यान नवनीत राणा यांच्यासह
कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात आधीपासूनच उपचार सुरु आहेत. आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती सध्या स्थीर असल्याची माहिती आहे.

COMMENTS