अमरावती – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शंभर टक्के मतदान !

अमरावती – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शंभर टक्के मतदान !

अमरावती – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दुपारी दोन पर्यंत शंभर टक्के मतदान झालं असल्याची माहिती आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यापैकी अमरावती येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातून 489 मतदार असून या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती आहे.

दरम्यान अमरावती स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत असून राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे. तसेच ते या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहेत. दुपारी दोन वाजून 15 मिनिटांपर्यंत अमरावती जिल्ह्यातील 489 उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सर्व उमेदवारांचं निकालाकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS