केंद्रिय अवजड उद्योग मंत्र्यांच्या गाडीला अपघात !

केंद्रिय अवजड उद्योग मंत्र्यांच्या गाडीला अपघात !

रायगड – केंद्रिय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खोपोलीकडून पालीकडे जात असताना पालीजवळ हा अपघात झाला असून या अपघातात अनंत गीते यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला  आहे. तसेच ते  सुखरुप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या ते पाली रेस्ट हाऊस येथे असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान गीते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीला दुचाकीस्वार आडवा आल्याने अचानक पुढच्या गाडीने ब्रेक लावला त्यामुळे  गीते यांच्या गाडीची धडक समोरील पायलट व्हॅनला बसली आहे.  तसेच पाठिमागच्याही पायलट व्हॅनची गीते यांच्या गाडीला धडक बसल्यामुळे हा अपघात झाला असून गिते यांंच्या डोक्याला किरकोळ मार लागला आहे तर गाडीतील सर्वजण सुखरुप असल्याची माहिती आहे.

COMMENTS