मनसे टाईमपास टोळी तर शिवसेना विरप्पन गॅंग

मनसे टाईमपास टोळी तर शिवसेना विरप्पन गॅंग

मुंबई – विक्रोळी परिसरातील शिवसेना शाखेच्यावतीने फुटपाथवरील विक्रेत्यांकडून १० रुपयांची वसुली केली जात असल्याने त्यांच्यावर मनसेने टिका केली होती. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर खंडणीखोरीचे आरोप केले होते. शिवसेना ही फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते, असं त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील नवीन वादाला तोंड फुटले.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकारण तापले आहे. विविध मुद्दांवर शिवसेना, भाजप हे पक्ष एकमेकांना खिंडीत काढण्याचे काम करीत आहे. अशात फुटपाथवरील विक्रेत्यांनाकडून पैसे गोळा केल्यानंतर मनसे विरुध्द शिवसेना असा वाद सुरु झाला.

अलीकडेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विरप्पन गँग असा उल्लेख केला होता. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी ‘मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे हेच मला कळत नाही. ही ‘टाइमपास टोळी’ आहे असंच म्हणावं लागेल. ह्यांच्याकडं स्वत:चे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपणही लक्ष देण्याची गरज नाही,’ असं म्हटलं आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात, असं म्हणत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

COMMENTS