पोलीस कंट्रोल रुममधील काॅल चक्क गृहमंत्री घेतात तेव्हा

पोलीस कंट्रोल रुममधील काॅल चक्क गृहमंत्री घेतात तेव्हा

पुणे – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नेहमी हटके कामे करतात. कधी ते अनाथ मुलीचा बाप बनून तिचे कन्यादान करतात. तर कधी केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांना त्यांच्या कवितांच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा देतात. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षांचे स्वागत आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत साजरा करण्यासाठी गृहमंत्री पुण्यातील पोलीस मुख्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस कंट्रोल रुमध्ये आलेला काॅल घेऊन त्यांची समस्या सोडवली.

ऊन, वारा ,पाऊस असो वा सण उत्सव! महाराष्ट्र पोलीस भावानांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देतात. काल सर्व जण आपापल्या कुटुंबीयांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करत होते. कारण आपल्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत होते. म्हणूनच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर्षी नवीन वर्षाचे स्वागत पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने पोलीस बांधवांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज मध्यरात्री १२ वा.पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये उपस्थित राहिले. यावेळी एक काॅल आला. तो चक्क अनिल देशमुख यांनी रिसिव्ह केला.

आनंदनगर येथील इंद्रनील आपटे यांनी आपल्या शेजारील इमारतीत मोठ्याने स्पिकर लावल्याचे सांगितले. देशमुख यांनी थोड्या वेळ्यात पोलीस पाठवतो. असे सांगून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांसोबत #HOPE असं लिहिलेला केक कापला. तसेच वायरलेसवरून सर्व पोलिसांना नववर्षाच्या दिल्या.

COMMENTS