26 वर्षांनंतर शरद पवारांची अनिल गोटेंनी घेतली भेट !

26 वर्षांनंतर शरद पवारांची अनिल गोटेंनी घेतली भेट !

मुंबई – भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी 26 वर्षांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणू लढवण्यासाठी अनिल गोटे हे इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर गोटे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यात संघर्ष वाढला होता, गोटेंनी पवारांवर आतापर्यंत विखारी टीका केली होती. परंतु आता हा संघर्ष मिटला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो धुळे मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, मला सुभाष भामरेंचा पराभव करायचा आहे मला यासाठी ज्यांची मदत घ्यायची आहे त्यांची मदत घेणार असून शरद पवार यांच्याबरोबर काय चर्चा झाली ती मी उघड करणार नाही असं गोटे यांनी बैठकीनंतर म्हटलं आहे.

COMMENTS