अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात भडकावणारा तो मातेफिरु कोण ?

अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात भडकावणारा तो मातेफिरु कोण ?

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीपवर चढून एकाने त्यांच्या श्रीमुखात भडकावली असल्याची घटना घडली आहे. एका रोड शो दरम्यान ही घटना घडली असून हा रोड शो दिल्लीच्या मोती नगर भागात सुरू होता. पोलिसांनी तातडीने या माथेफिरूला ताब्यात घेतलं असून याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांचा प्रचार सुरु आहे. आज रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान एका माणसाने जीपवर चढत त्यांच्या थोबाडीत ठेवून दिली. ज्यानंतर थोबाडीत देणाऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा माथेफिरु नेमका कोण आहेे आणि त्याने हे कृत्य का केलं? याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS