आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाणांचं मोठ वक्तव्य!

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाणांचं मोठ वक्तव्य!

नांदेड – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक नसल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसकडून नांदेड जिल्ह्यातील विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. आज अशोक चव्हाण यांच्या पारंपरिक भोकर मतदार संघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम होता, परंतु अशोक चव्हाण यांनी मुलाखत दिली नाही.

दरम्यान अशोक चव्हाण यांनी आगामी निवडणूक लढवण्यासाठीची पक्षाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच त्यांनी स्वतः पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. त्यामुळे चव्हाण हे निवडणूक लढवणार नसल्याचं दिसत आहे. परंतु पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा लढवण्यास इच्छुक नसणारे अशोक चव्हाण आगामी निवडणूक लढवणार की नाही हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS