अशोक चव्हाण यांनी वाहिली गुरुदास कामत यांना श्रद्धांजली ! VIDEO

अशोक चव्हाण यांनी वाहिली गुरुदास कामत यांना श्रद्धांजली ! VIDEO

मुंबई –काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते.  कामानिमित्त कामत दिल्लीला गेले होते. आज सकाळी त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीनं दिल्लीच्या चाणक्यपुरी इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांनी अखेर श्वास घेतला. मुंबईतील एक मासबेस, अभ्यासु आणि निष्ठावंत काँग्रेस नेते म्हणून कामत यांची ओळख होती. काँग्रेसमधील अनेक पदांवर त्यांनी काम केलं. त्यांच्या अचानक जाण्यामुळे काँग्रेस परिवारात शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुदास कामत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चव्हाण यांनी कामत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मोठा धक्का बसला असून त्यांच्या अचानक जाण्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS