भाजप सुडाचं राजकारण करत आहे – अशोक चव्हाण

भाजप सुडाचं राजकारण करत आहे – अशोक चव्हाण

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चदंबरम यांना आज सकाळी सीबीआयनं अटक केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कार्ती चिदंबरम यांची अटक हे भाजपच्या सुडाच्या राजकारणाचे उदाहरण असून निरव मोदी, मेहुल चोकसी यांच्या घोटाळ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच काँग्रेस पक्ष अशा सुडबुध्दीच्या कारवाईला घाबरत नसून या सरकारची गैरकृत्य उघड करून जनतेसमोर सत्य मांडण्याचे आपले काम करत राहील असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप कार्ती चिदम्बरम यांच्यावर आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते.

COMMENTS