विधानसभा पोटनिवडणूक – दोन्ही ठिकाणी भाजप पिछाडीवर !

विधानसभा पोटनिवडणूक – दोन्ही ठिकाणी भाजप पिछाडीवर !

नुकत्याच पार पडलेल्या राजस्थानमध्ये विधानसभेची रामगड या जागेवर पोटनिवडणूक झाली आहे. त्याची मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराने सुमारे 10 हजार मतांची आघाडी घेतली आहे. भाजपचा उमेदवार या ठिकाणी पिछाडीवर आहे. तर दुसरीकडे हरियाणामध्ये जिंद विधानसभा पोटनिवडणुकीत जननायक जनता पार्टीचे उमेदवार दिग्गविजय चौटाला हे आघाडीवर आहेत. भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

दोन्ही ठिकाणची निवडणूक भाजप आणि काँग्रेसनं प्रतिष्ठेची केली होती. राजस्थानमध्ये काँग्रेसनं आघाडी घेत काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. भाजपला दुस-या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. हरियाणात मात्र काँग्रेसचा उमेदवार थेट तिस-या क्रमांकवर फेकला गेला आहे. तर भाजप दुस-या क्रमांकावर आहे. थोड्याच वेळात अंतिम निकाल येईल.

COMMENTS