‘या’ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला अच्छे दिन?

‘या’ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला अच्छे दिन?

नवी मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस -राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळे काँग्रेस -राष्ट्रवादीला फटका बसत आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत काँग्रोसला अच्छे दिन येत असल्याचं दिसत आहे. कारण माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह इतर नाईक कुटुंबीय भाजपच्या वाटेवर असल्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला अखेरची घरघर लागत आहे. येत्या काळात संपूर्ण नाईक कुटुंबीय भाजपात दाखल होणार असल्याने काँग्रेसला ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभांपैकी एकावर दावा करता येणार आहे.

दरम्यान याठिकाणी अनेक वर्षांपासून काँग्रोसच्या अनेक नेत्यांचे नाईकांसोबत विळाभोपळ्याचे नाते आहे. परंतु पक्षाआदेश म्हणून निवडणूकीत नाईकांना ते मदत करत होते. परंतु आता नाईक कुटुंबीयच भाजपात गेले तर याठिराणी काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेची निवडणूक लढता येणार आहे.

2009 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये असताना नामदेव भगत यांनी बंडखोरी करून बेलापूर विधानसभेत नाईकांना अव्हान दिले होते. परंतू नाईकांपूढे त्यांचा टीकाव लागला नव्हता. त्यानंतर 2014 ला राज्यभरात काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळी लढल्याने भगत यांना पुन्हा पक्षातर्फे बेलापूरमधून गणेश नाईकांविरोधात तर रमाकांत म्हात्रे यांना ऐरोली मतदार संघातून संदीप नाईकांविरोधात उमेदवारी दिली होती. मात्र मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता नाईक कुटुंबीयच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला ऐरोली व बेलापूर मतदारसंघात पुन्हा उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही जागा राष्ट्रवादीला न सोडता त्यावर काँग्रेसकडून दावा केला जाणार असल्याचं बोललं जत आहे.

COMMENTS