राज्यातील सर्वात चर्चेतील जागांवर कोण मारणार बाजी? एक्झिट पोल!

राज्यातील सर्वात चर्चेतील जागांवर कोण मारणार बाजी? एक्झिट पोल!

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर आता निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील काही चर्चेतील जागांवर काय होणार याबाबतची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यापूर्वी माध्यमांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. या पोलनुसार, महाराष्ट्रात काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी, बारामती, सातारा, वरळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान परळी मतदारसंघात भाजपच्या
पंकजा मुंडे यांना धक्का बसणार असून याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा विजय होईल असा अंदाज आहे.परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या होत्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तर बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांचा विजय होणार असल्याची शक्यता असून याठिकाणी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना धक्का बसणार आहे.

सातारा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवेंद्र भोसले यांचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. ते यावेळी भाजपमधून निवडणूक लढवत आहेत.

वरळी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा विजय होणार असल्याचा अंदाज आहे. वरळी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकांच्या रिंगणात आदित्य ठाकरे उतरले आहेत.

शिर्डी मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय होईल असा अंदाज आहे.

येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा विजय होईल असा अंदाज आहे.

लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस विजयी होणार असल्याचा अंदाज आहे. याठिकाणी दिवंगत विलासराव देशमुख यांचे पूत्र अमित आणि धीरज देशमुख हे मैदानात आहेत.

mahapolitics exit poll

COMMENTS