रामदास आठवले मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक !

रामदास आठवले मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघातून आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं रामदास आठवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलं आहे. आज घेण्यात आलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या बैठकी आठवले यांनी  पदाधिका-यांसबोत बैठक घेतली. या बैठकीत आठवले यांनी या मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान रामदास आठवले हे सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसचे पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत त्यांचा 2009 मध्ये पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांनी दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून या विभागात आठवले यांच्या रिपाईंची संघटनात्मक बांधणी चांगली आहे.

 

COMMENTS