बाबा रामदेव यांचे शेतक-यांविषयी अत्यंत  संतापजनक वक्तव्य !

बाबा रामदेव यांचे शेतक-यांविषयी अत्यंत  संतापजनक वक्तव्य !

जालना – योगगुरू बाबा रामदेव शनिवारी जालनामध्ये एका योगशिबीरासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शेतक-यांविषयी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं.  शेतक-यांच्या सर्वात जास्त पैसा हा औषधे, रसायने आणि दारुवर खर्च होतो असं वक्तव्य त्यांनी केलं. रसायने आणि औषधांवर सर्वात जास्त पैसा खर्च होतो हे  आपण समजू शकतो. मात्र त्यांनी दारुलाही त्यामध्ये घुसडलं. त्यामुळे बाबा रामदेव हे शेतक-यांना दारुडे समजतात की काय असा प्रश्न निर्माण होतोय.

बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावरुन शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होतोय. बाबा रामदेव यांनी केवळ योगाचे धडे द्यावेत. इतर बाबतीत वायफळ बडबड करु नये. दारु पिऊन बाबा रामदेव योग शिकवतात का अशा शब्दात शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. असं वक्तव्य करुन बाबा रामदेव हे शेतक-यांच्या दुःखावर मीठ चोळत असल्याचंही शेतक-यांचं म्हणणं आहे. सरकारची हुजरेगिरी कारायची तर करा मात्र शेतक-यांविषयी असे बोलू नका असंही शेतकरी म्हणत आहेत.

COMMENTS