त्यामुळे स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द, मंत्री नवाब मलिकाची कबुली !

त्यामुळे स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द, मंत्री नवाब मलिकाची कबुली !

मुंबई – दादर येथील इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. निमंत्रणावरुन सुरु झालेली नाराजी, प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती यामुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. लवकरच या कार्यक्रमाची रुपरेषा आणि पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदुमील पायाभरणी कार्यक्रमाचे नियोजन न करण्यात आल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून या कार्यक्रमाला अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा निमंत्रण न दिल्यामुळे राज्य सरकारने हा कार्यक्रम सध्यातरी रद्द केला आहे. हा कार्यक्रम नियोजनाअभावी रद्द केला असल्याची कबुली मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

COMMENTS