आमदार बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

आमदार बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

मुंबई – प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. बच्चू कडून यांनी ‘कृष्णकुंज’वर जाऊन आज राज ठाकरे यांची भेट घेतली असून राजकीय विषयावर त्यांनी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु नेमकी कोणत्या विषयावर या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. याबाबतची माहिती मिळाली नाही.

दरम्यान बच्चू कडू यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर आजपर्यंत आवाज उठवला असून विदर्भातील आणि राज्यातील शेतक-यांच्या मागण्यांसाठी त्यांनी अनेकवेळा आंदोलनं केली आहेत. राज्यातील शेतक-यांच्या समस्या आणि आगामी निवडणुकांबाबात राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बच्चू कडू हे मनसेला पाठिंबा देणार का याबाबतचा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

COMMENTS