जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचं त्यांचं राजकारण

जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचं त्यांचं राजकारण

मुंबई : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पाऱ्श्वभूमीवर माजी आमदार वसंत गिते व सुनील बागुल यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन शिवसेनेचे शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेना-मनसे-भाजप आणि पुन्हा शिवसेना असा प्रवास करणाऱ्या या नेत्यांनी यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या काही नेत्यांवर टीका केली होती. त्यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट करीत संबंधितांवर हल्ला चढवला.

गिते म्हणाले होते की, नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे मनसे पक्ष सोडला.त्यावर नांदगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून गिते व बागुल यांच्यावर टिका केली. ‘दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील काही ‘अतिशय मोठे’ नेते बोलले की नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच ‘मोठे नेते’ आहेत, ज्यांनी मनसेची चलती असताना शिवसेना सोडली, भाजपची सत्ता असताना मनसे सोडली, शिवसेनेची सत्ता असताना पुन्हा भाजप सोडला. एवढ्या “निष्ठावंत” नेत्यांवर काय बोलणार? ‘जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचं त्यांचं राजकारण आहे. ते त्यांनाच लखलाभ असो.’

‘राजकीय जीवनात असताना वैयक्तिक शेरेबाजी करणं शक्यतो मी कायमच टाळत आलो आहे, परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाहीत म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘गेल्या घरी सुखी राहा, अशा शुभेच्छा व मैत्रीपूर्ण सल्लाही नांदगावकर यांनी गिते व बागुल यांना दिला आहे.

COMMENTS