देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर !

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर !

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री भाजपला विश्वासात घेतात, पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात अशी टीका काँग्रेस प्रेदशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. भाजप नेते फक्त तक्रारीला राज्यपालांकडे जात आहेत. त्यांना त्याशिवाय काही जमत नाही. किमान या काळात तरी तक्रार करत बसू नका, सरकारला साथ द्या. त्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहेत पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात.भाजपला कायम खोटेपणा दिसून येतो असं थोरात यांनी म्हटलं आहे.

तसेच केंद्राचं पॅकेज म्हणजे झाडं लावा आधी मग त्यांना फळं येतील आणि त्यानंतर तुम्ही भूक भागवायची, अशी टीकाही थोरातांनी केंद्र सरकारवर केली आहे.

काय म्हणालेत फडणवीस ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे. यावेळी केंद्राने स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे 85 टक्के पैसे दिले, राज्याने 15 टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च किती येतो हेच माहित नाही अशी टीका केली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत, मात्र कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था, तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही का? आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. बारा बलुतेदारांवरही संकट आलं असून केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं.राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

तसेच रसामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही, त्यांनाही देण्याच्या सूचना आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच मिळत नाही, रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

COMMENTS