शेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात

मुंबई – केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकाच्या मुद्द्यावर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चर्चा न होता संख्याबळाच्या जोरावर या सरकारनं तीन विधेयक संमत केले. त्यामुळे पुन्हा एकदा कंपनी राज येणार असल्याचं दिसत आहे. मार्केट कमिटी मोडीत काढून शेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच
लोकशाहीत असा निर्णय कसा होऊ शकतो. याचा आम्ही निषेध करतो. हे तीनही विधेयक मागे घेतले पाहिजे असंही थोरात म्हणाले आहेत.

दरम्यान पक्षाच्या पलीकडे जाऊन भाजपमधील काही नेत्यांनी विरोध केला पाहिजे. पंजाब आणि हरियाणा याला तीव्र विरोध करत आहेत. त्यामुळे आता आपल्या राज्यातही विरोध वाढणार असल्याचही थोरात म्हणाले आहेत.
तसेच मराठा आरक्षणामुळे भरती प्रक्रियेवर काय परिणाम होईल ते पाहून निर्णय घेतला जाईल असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

COMMENTS