‘ती’ आमच्यासाठी अभिमानाची बाब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया!

‘ती’ आमच्यासाठी अभिमानाची बाब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया!

मुंबई – आयएनएस आणि सी-व्होटर्सने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत एक देशपातळीवर सर्व्हे केला होता. या यादीत लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होणे ही आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी नेतृत्व कसं करावं हे दाखवून दिलं आहे. हे सरकार तीन पक्षांचं आहे. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सरकारचं उत्तम नेतृत्व करत आहेत. हे महाविकास आघाडीचं सरकार सर्व सामान्य व्यक्तीवर लक्ष केंद्रीत करणारं आहे. वेगवेगळी विचारधारा एकत्र आलेल्या आहेत. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचं यशस्वीपणे नेतृत्व करत असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दली आहे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रिपद हे निमित्त आहे, महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय आहे” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

टॉप 5 मुख्यमंत्र्यांची यादी

1) नवीन पटनायक – ओदिशा 82.96 टक्के

2) भूपेश बघेल – छत्तीसगड 81.06 टक्के

3. पिनराई विजयन – केरळ 80.28 टक्के

4. जगनमोहन रेड्डी – आंध्र प्रदेश 78.52 टक्के

5. उद्धव ठाकरे – महाराष्ट्र 76.52 टक्के

COMMENTS