बीडमध्ये कोणाला धक्का बसणार ?, जयदत्त क्षीरसागर उद्या घेणार मोठा निर्णय!

बीडमध्ये कोणाला धक्का बसणार ?, जयदत्त क्षीरसागर उद्या घेणार मोठा निर्णय!

बीड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यात कोणाला धक्का देणार याकडे लक्ष लागलं आहे. उद्या क्षीरसागर यांनी विशेष बैठक बोलावली असून, या बैठकीत ते मोठा निर्णय घेणार आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांसोबत दिसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत ते अनेकवेळा एकाच मंचावर दिसले आहेत.  त्यामुळे ते भाजपमध्ये जातील असं बोललं जात आहे. तसेच क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. क्षीरसागर यांनी वज्रमूठ असलेल्या फोटोसोबत लढा असं लिहून पोस्ट केल्याने, ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

COMMENTS