परळीत पंकजा मुंडेंच्या घरासमोर भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा!

परळीत पंकजा मुंडेंच्या घरासमोर भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा!

बीड – भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळीतील घरासमोर भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. मनसे आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच हा राडा झाला. आंदोलनासाठी
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंच्या घराकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. तरीही मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी मध्यस्थी होऊन वाद मिटवला आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली.

दरम्यान पन्नगेश्वर साखर कारखान्याकडून ऊसतोड मजुरांचे ‘एफआरपी’चे बिल थकवल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. कारखान्याच्या संचालिका पंकजा मुंडे यांच्या परळीतील ‘यशश्री’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची हाक मनसेने दिली होती.
मनसे आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच भाजप कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले असल्याचं पहावयास मिळाले.

COMMENTS